सुहागरात्रीची गोष्ट: पांढरी चादर

सुंदर गुलाब पुष्प चित्रे असलेल्या नव्याकोऱ्या चादरीवर बसलेली नवपरिणीत आराध्या आपल्या मोबाईलमध्ये काही फोटो पाहत होती. तेवढ्यात तिचा पती नरेश खोलीत आला. येताच तो आपल्या नव्या नवेली नवरीला म्हणाला, “हाय जानेमन! काय करत आहेस मोबाईलमध्ये? आज आपली पहिली रात्र सुहागरात्र आहे ना?”

आराध्या: माझी मैत्रीण मीनाक्षीने माझ्या विदाईचे काही फोटो पाठवले आहेत. ते तिने तिच्या मोबाईलमध्ये घेतले होते. तुम्ही पण पहा किती भावूक करणारे फोटो आहेत! बघा.

आराध्याने आपला फोन आपल्या पतीकडे दिला. पण फोटो न पाहताच नरेश म्हणाला: हो हो ठीक आहे. आज आपली पहिली रात्र आहे तर ते बदाम घातलेले दूध आणलं की नाही?

आराध्या: ते काय झालं की काल रात्री मी बरोबर झोपली नव्हते तर माझं डोकं दुखत होतं. तर मम्मीजीने मला कॉफी दिली होती. आता मी तेच प्यायली आहे. तुम्ही पिणार का कॉफी?

त्याच्या उत्तराची वाट न बघता आराध्याने एका कपात कॉफी घ्यायला लागली.

“नको नको तूच घे.”

नरेशच्या कॉफीला नकार देण्यावर आराध्याने स्वतः कॉफीचा कप उचलला आणि प्यायला लागली. तेवढ्यात तिने आपल्या पतीच्या हातात काहीतरी पाहिलं.

तिने त्याला विचारलं: हातात काय आहे?

नरेश म्हणाला: ही पांढरी चादर आहे. याला बेडवर टाकू.

आराध्या: अरे आज तर आपली रंगीन रात्र आहे ना? मग पांढरी चादर कशाला? तुम्हाला ही रंगबिरंगी फुलांची चादर आवडली नाही का? जरा बघा ना किती सुंदर गुलाबाचे फुलं आहेत! आणि तुमची ही पांढरी चादर!

नरेश म्हणाला: आराध्या आज आपली सुहागरात्र आहे. हे आपले अविस्मरणीय क्षणानी भरलेली रात्र होणार आहे. त्या रात्री साठी आपण कितीतरी स्वप्न बघितले आहेत. अंथर या चादरीला.

आराध्या: पण कशाला? काय गरज आहे?

नरेश: समजण्याचा प्रयत्न कर आराध्या. हे आवश्यक असते सुहागरात्रीत पांढरी चादर अंथरणं आवश्यक असते.

आराध्या: काय अर्थ आहे तुमच्या बोलण्याचा?

नरेश: अगं हे एक शगुन असतं आराध्या. तुला काहीच माहिती नाही?

आराध्या म्हणाली: मला काय माहिती नाही? पण तुम्ही पांढरी चादर टाकायला एवढा आग्रह का करत आहात?

नरेश: आराध्या तुला माहिती असायला हवं की आजच्या रात्री तुला स्वतःला सिद्ध करायचा आहे.

आराध्या म्हणाली: काय सिद्ध करायचा आहे पण? सांगा ना.

नरेश: आराध्या मला म्हणायचं आहे की तुझं कौमार्य… म्हणजे तू लग्न आधी कुणासोबत सेक्स….

आराध्या: ओ माय गॉड!! हे भगवान! किती फालतू गोष्ट करत आहात तुम्ही नरेश!

आराध्याने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाली: आता माझ्या लक्षात आलं तुम्हाला ही पांढरी चादर का हवी आहे.

आपल्या हातातला फोन बेडवर फेकत आराध्या खोलीच्या बाहेर आली. तिला फार राग आला होता. पण दुसऱ्या क्षणी स्वतःला सांभाळत आराध्या जोराने म्हणाली: हो मी लग्नाआधी आपल्या बॉयफ्रेंड सोबत सेक्स केली आहे. आणखी काही ऐकायचं आहे तुम्हाला?

नरेश: काय म्हणालीस तू आराध्या? आणि हे काय नाटक आहे? याचा अर्थ तू कुमारी नाही आहेस!

आराध्या: पण तो माझा भूतकाळ होता आणि तुम्ही माझे भविष्य आहात! आणि तुम्ही तर असे वागत आहात जसंका तुमची कोणीच गर्लफ्रेंडच नव्हती! बरोबर बोलत आहे ना मी?

नरेश: आराध्या तू मुलगी आहेस आणि मी मुलगा. मला जे पाहिजे ते मी करू शकतो समजले?

आराध्या म्हणाली: खरंच जे पाहिजे ते करू शकता?

नरेश: तुला स्वतःच्या मर्यादेत राहायला पाहिजे आराध्या. तुला लाज वाटायला पाहिजे.

आराध्या: हो का? म्हणजे तुम्हाला काय वाटलं की तुझ्यासारख्या माणसासाठी पांढऱ्या चादरीवर मी स्वतःला सिद्ध करु?

नरेशचा हात एकदम आराध्याकडे उठला. तेवढ्यात त्याचा हात पकडत आराध्या रागात म्हणाली: अशी हिंमत करू नका.

या साऱ्या भांडणामुळे घरची सर्व मंडळी जागी झाली. सोबतच नरेशची बहीण आणि आईसुद्धा बाहेर आली आणि म्हणाली, “काय झालं नरेश?”

नरेशची बहिण म्हणाली: दादा काय झालं? काही बोलत का नाही तुम्ही? तुम्ही दोघं भांडण का करत आहात? हे तर खुशीचे क्षण आहेत आणि हे सर्व काही होत आहे?

आई म्हणाली: आराध्या तूच सांग की काय झालं?

आराध्या: मम्मीजी, तुम्ही तर समाजसेविका आहात. कितीतरी संस्थांचे तुम्ही सदस्य आहात. मला तर हेही सांगितला गेला आहे की तुम्ही वैचारिक दृष्ट्या समाजाचे उद्बोधनाचे काम करता. आपल्या समाजातल्या काही वाईट प्रथा बाहेर फेकण्यासाठी तुम्ही कार्यशील आहात. आता मम्मीजी जरा मला सांगा की आजच्या युगात कौमार्याची काय किंमत आहे?

ती बोलतच राहिली.

हा तुमचा शिकला सवरलेला इंजिनीयर मुलगा जो मागच्या दोन महिन्यापासून माझ्यासोबत फिरून लग्नाच्या मंडपात मला किस करून स्वतःला मॉडर्न समजत होता आज तोच तुमचा मुलगा आमच्या सुहागरात्री पांढरी चादर घेऊन आला आहे. काय अर्थ आहे याचा? काय सिद्ध करू? हा तर स्वतः वर्जिन नाही पण याला बायको मात्र व्हर्जिन हवी.

नरेश रागाने म्हणाला: तु चुप बस आराध्या! तुझ्यात संस्कार आहेत की नाही? काय नाटक करत आहेस हे तू सर्वांसमोर?

आराध्या म्हणाली: मम्मी नेहमी असंच का होतं की एका मुलीला ह्या सर्व संकटांतून जावं लागतं? पुरुष त्याला वाटेल तितक्या वेळा लग्ना आधी सेक्स करू शकतो तरी तो पवित्र राहील पण मुलगी? पण मुलीला तर तिच्या सुहागरात्री पांढऱ्या चादरीवर रक्ताचे डाग सोडावेच लागतात!

यावर नरेशची बहिण मीता आराध्या जवळ येऊन तिच्या खांद्यावर आपला हात ठेवून म्हणाली: तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात वहिनी. दादा वहिनी सारखंच मीही वर्जिन नाही. माझाही एक बॉयफ्रेंड आहे आणि मी त्याला माझं कौमार्य दिला आहे!

मीताची आई चकित होत म्हणाली: हे काय बोलत आहेस तू मीता? तुझं डोकं ठिकाणावर आहे की नाही?

मीता: हो मम्मी. मी कुमारी नाही.

आपल्या पोरीचं बोल ऐकून मम्मीने आपलं डोकं पकडलं. नरेशही मटकन खाली बसला.

मम्मी: हे राम!! हे मी काय ऐकत आहे!

मीता म्हणाली: दादा त्रास झाला नाही ऐकून? पण घाबरू नका. मी असं काहीच केलं नाही. मी कोणाशीही सेक्स केले नाही. पण मला माहीत आहे की माझ्या योनीचा पडदा फाटला आहे. मी बॅडमिंटन खेळते, योगा करते, डांस करते, सायकल चालवते हे सर्व करताना मुलींच्या योनीचा पडदा फाटणे सामान्य गोष्ट आहे. वैद्यक शास्त्रीय पुरावा आहे त्याला. आता जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा मी स्वतःला पांढऱ्या चादरीवर कुवारी सिद्ध नाही करू शकणार आणि माझा नवराही मला व्यभिचारी समजेल. आता माझा भाऊ माझ्या वहिणीला समजत आहे तसा.

नरेश: हे तू काय बोलत आहेस मीता?

मीता म्हणाली: दादा मी तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखते. तुमचं किती मुलींशी अफेअर आहे? बरं दोन-तीन जणीना तर मी ओळखते ही. त्यांनी मला सांगितले की तुझ्या भावाने आमच्या शरीराचा उपभोग घेतला आहे म्हणून.

नरेश: हे सर्व काय बोलत आहेस मला तर काहीच कळत नाही आहे.

मीता: तुम्हाला माहित आहे जगभरच्या लाखो मुली कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या योनीचा पडदा हरवून बसतात आणि मग पांढऱ्या चादरीवर होणाऱ्या परीक्षेत नापास होतात. मग त्यांचा पती त्यांच्यावर संशय घेतो आणि त्यांचे जीवन बरबाद होते. जर एखाद्या मुलीच्या सुहाग रात्री पांढऱ्या चादरीवर लाल डाग आले तर ती तिच्या पतीच्या नजरेत पवित्र ठरते. पण ज्या मुलीच्या सुहाग रात्री पांढऱ्या चादरीवर लाल डाग आले नाहित तर ती अपवित्र ठरते.

कुठं पर्यंत चालेल हे सर्व सांगा? केव्हा पर्यंत आम्हा मुलींना या आगीच्या दरीतून जावे लागेल? केव्हा पर्यंत मुलींना आपल्या देहा खाली पांढरी चादर अंथरावी लागेल? मम्मी सांग ना केव्हा पर्यंत सुरू राहील हे?

तेव्हा आराध्या म्हणाली: खरं म्हणजे पुरुष आपल्याला गुलाम समजतात. पुरुषाने कधीच स्त्रीची इज्जत केली नाही. पुरुषासाठी तर स्त्री फक्त त्याच्या शरीराची आग विझवण्याची वस्तू आहे.

मीता म्हणाली: तुम्ही बरोबर बोलत आहात वहिनी.

आराध्या म्हणाली: ज्या दिवशी स्त्रीला पुरुषाबरोबर अधिकार मिळेल तेव्हा ह्या पांढ-या चादरीची चाल बंद होईल.

नरेश रागाने पागल होऊन म्हणाला: ही मुलीने आपल्या बेशरमीच्या सर्व सीमा पार केल्या आहेत. मम्मीजी तिला सांगा की आत्ताच माझं घर सोडून निघून जावं.

मम्मी म्हणाली: माझी सून कुठेच जाणार नाही. ती आपल्या बरोबर जागी आहे. आता वेळ आली आहे बेडवर टाकलेल्या पांढऱ्या चादरीच्या जागी लाल चादर टाकण्याची. पुरुषांची विचारसरणी बदलण्याची वेळ आली आहे. नरेश तू पांढरी चादर का टाकत आहेस? मला सांग की तू वर्जिन आहेस? सिद्ध करशील? जर नाही सिद्ध करु शकत तर तू या घराला सोडायचा विचार कर. हा घर तुझा नाही माझा आहे. आराध्याला मी या घरची लक्ष्मी बनवून आणली आहे ती तर आता येथेच राहील.

नरेश: मला माझी चूक कळली आहे. आपल्याला जुनाट विचार सोडायलाच हवेत. स्त्रियांवरील अन्याय थांबले पाहिजेत. मी बदलतो ती चादर. ये आराध्या. मला माफ कर. मीता तुही मला माफ कर.

आणि अश्या रीतीने नातं बिघडता बिघडता वाचलं.

Comments:

No comments!

Please sign up or log in to post a comment!